खारेपाटण (प्रतिनिधी) : रोटरी क्लब ऑफ वैभववाडी चे अध्यक्ष व खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक मा. रो. प्रशांत गुळेकर यांच्या प्रयत्नातून खारेपाटण येथील शेठ न.म. विद्यालयास टू इन वन कलर प्रिंटर व कॉपीअर भेट देण्यात आला. याबद्दल रोटरी क्लब वैभववाडीचे खारेपाटण हायस्कूलच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ वैभववाडी यांच्या माध्यमातून यापूर्वीही खारेपाटण हायस्कूलच्या विद्यार्थ्यांच्या बैठक व्यवस्थेची गरज लक्षात घेऊन एकूण २०० बेंचेस प्रशालेस भेट देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये प्रशालेचे विश्वस्त रोटरियन प्रशांत गुळेकर यांनी विशेष प्रयत्न केले होते.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने रोटरी क्लब वैभववाडी चे सचिव रो. सचिन रावराणे, खजिनदार रो. प्रा. नामदेव गवळी, तसेच माजी अध्यक्ष रो. संजय रावराणे आणि रो. AG डॉ. विद्याधर तायशेट्ये, रो. मेघना गुळेकर मॅडम, रो. संजना रावराणे मॅडम रो. मुकुंद रावराणे, झुंजार मित्र मंडळ खारेपाटण चे अध्यक्ष संकेत शेटये व संकेत लोकरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचे प्रशालेच्या वतीने प्राचार्य संजय सानप, पर्यवेक्षक संतोष राऊत, विश्वस्त राजेंद्र वरूणकर, योगेश गोडवें यांनी आभार मानले.











