जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांचे आवाहन
कणकवली (प्रतिनिधी) : 19 फेब्रुवारी 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कणकवलीतील आप्पासाहेब पटवर्धन चौक येथे सकाळी 10.30 वाजता उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. तरी शिवसेना आजी माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी केले आहे.