बिडये बंधूंचे घर आगीत भस्मसात नांदगाव येथील

शॉर्ट सर्किट झाल्याचा प्राथमिक अंदाज; काही वेळातच झाला सिलेंडर चा ही स्पोट

नांदगाव (प्रतिनिधी) : नांदगाव मोरये वाडी येथील मनोहर आत्माराम बिडये व पुजा देवेंद्र बिडये यांच्या सामाईक बंद घराला रात्री ८:३० सुमारास अचानक आग लागली. या आगीत पुर्ण घर आणि दुकान जळून बेचिराख झाले. सुमारे एक तासानंतर दाखल झालेल्या अग्निशामक बंबालाही ही आग आटोक्यात येताना कठीण जात होते. मुंबई गोवा महामार्गावर बिडये कुटुंबियांच्या घराला आग लागली. बिडये कुटूबिय मुंबई येथे वास्तव्यास असतात. तर सुनंदा बिडये या आजी येथे असतात मात्र तब्येत बरी नसल्याने काही दिवसांपुर्वी या आजी मुंबई येथे गेल्या होत्या.तर याच घरात किराणा मालाचे लवू राजाराम लाड हे दुकान चालवितात मात्र हे दुकानही एक महिन्यापासून बंद आहे. सुमारे ८:३० च्या सुमारास आग लागल्याचे लोकांच्या निदर्शनास आले. यानंतर स्थानिकांकडून अग्निशामक दलाला कळविण्यात आले. मात्र एक तासाने बंब दाखल झाला. तोपर्यंत आगिने संपूर्ण घर आपल्या विळख्यात घेऊन रौद्र रूप धारण केले. यामध्ये संपूर्ण घर जळून खाक झाले. सिलेंडर स्फोट हि घटना समजताच नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. याचवेळी घरात असलेल्या सिलेंडरचा मोठा स्फोट झाल्याने नागरिकही भयभीत झाले. शॉर्ट सर्किट झाल्याचा प्राथमिक अंदाज हि आग नेमकी कशी लागली याचे नेमके कारण कळले नसले तरी शॉर्ट सर्किट झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची कणकवली पोलीसांना खबर मिळताच कणकवली व कासार्डे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

error: Content is protected !!