वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघ व माता रमाई महिला मंडळ वैभववाडी यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

वैभववाडी (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज हे पहिले राजे आहेत. जे रयतेची काळजी घेणारे, महिलांचा मानसन्मान, आदर करणारे, शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत करणारे एकमेव राजे होऊन गेले. म्हणूनच त्यांच्यासाठी अनेक जणांनी स्वतःचा जीवाची बाजी लावायला ही मागेपुढे पाहिले नाही. अशा छत्रपती शिवाजी महाराजांना प्रांत जात धर्म यात अडकवू नका  महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशामध्ये त्यांचे राज्य पसरले होते. असे प्रतिपादन मुंबई महानगरपालिकेचे सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी अभियंता संजय जाधव यांनी केले

वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघ व माता रमाई महिला मंडळ वैभववाडी यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती वैभववाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन येथे साजरी करण्यात आली. यावेळी जाधव बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे उपाध्यक्ष संतोष कदम हे होते.  महिला मंडळाचे अध्यक्ष तथा माजी समाज कल्याण सभापती शारदा कांबळे, महिला मंडळाच्या सचिव रुचिता कदम, आरोग्य विस्तार अधिकारी सुप्रिया कांबळे,आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना जाधव पुढे म्हणाले,छत्रपती शिवाजी महाराजांवर संत तुकाराम महाराज यांच्या विचारांचा प्रभाव होता. त्यांनी आपल्या राज्यामध्ये रयतेची पिळवणूक करणारी वतनदारी पद्धत मोडून काढली. जमिनीची मोजणी केली,  भूमीहीनाना शेत जमीन दिली. शेत सरा ठरवून दिला. शेतकऱ्यांना बी बियाणे व शेती अवजारे उपलब्ध करून दिली. शेतकऱ्यांना दुष्काळी काळात त्यांच्याकडून शेतसारा वसूल करू नये असे आदेश दिले. तसेच सैनिकांनी शेतकर्याच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये.असा आदेश दिला. यावरून छत्रपती शिवाजी महाराज यांची शेतकऱ्या प्रति असलेली आत्मीयता दिसून येते. म्हणूनच खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे ठरले. त्यांच्यासाठी अनेकांनी आपल्या जीवाचे बलिदान दिले. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक झाल्यानंतर अटके पासून कर्नाटक मद्रास गुजरात पर्यंत आपले राज्य पसरले होते. त्यामुळे अशा थोर पुरुषांना जात प्रांत धर्म यात अडकवू नका. असे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाचे औचित्य साधून माता रमाई  महिला मंडळाच्या सचिव रुचिता कदम यांची शिक्षण विस्तार अधिकारी पदी तसेच सदस्या सुप्रिया कांबळे यांची आरोग्य विस्तार अधिकारी पदी पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचा संघाच्या वतीने शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी शारदा कांबळे, संतोष कदम यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाची प्रस्तावना संघाचे सरचिटणीस रवींद्र पवार तर सूत्रसंचालन व आभार शरद कांबळे यांनी मांडले यावेळी संघाचे कार्यकर्ते धर्मरक्षित जाधव, अजित कदम,बाळू पेडणेकर, प्रवीण जाधव, श्री.जंगम, प्रीतम जाधव, राजेश कांबळे, प्रदीप कांबळे,  यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!