खारेपाटण (प्रतिनिधी) : केदारेश्वर मित्र मंडळ खारेपाटणच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मर्यादित षटकांच्या खुल्या भव्य टेनिस बॉल ओहर आर्म क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ आज शुक्रवार दि.२१ फेब्रुवारी २०२५ रोजी खारेपाटण गावचे उपसरपंच महेंद्र गुरव यांच्या शुभहस्ते श्रीफळ फोडून व फित कापून करण्यात आले. श्री देव केदारेश्वर मंदिराच्या भव्य पटांगणावर भरविण्यात आलेल्या य क्रिकेट स्पर्धेच्या उद्घघान प्रसंगी खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर, माजी सरपंच रमाकात राऊत, खारेपाटण सोसायटीचे संचालक विजय देसाई, ग्रा.पं.सदस्य सुधाकर ढेकणे, किरण कर्ले, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार संतोष पाटणकर, नडगिवे माजी सरपंच अमित मांजरेकर, स्थानिक मंडळाचे कार्यकर्ते भाऊ राणे, अमोल गुरव, विठ्ठल गुरव, सुरेश गुरव, राज गुरव आदी मान्यवर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
या स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक २५,५५५ /- रुपये रोख व आकर्षक चषक तर द्वितीय क्रमाकांचे पारितोषिक १५५५५ /- व आकर्षक चषक असे ठेवण्यात आले आहे. तर मालीकावि सामनावीर, उत्कृष्ट गोंलदाज, उत्कृष फलंदाज, उत्कृष्ट शेत्ररकशक याना आकर्षक ट्रॉफी देण्यात येणार आहे. तसेच दि.२१ फेब्रुवारी २०२५ ते २३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत सलग तीन दिवस चालणाऱ्या या क्रिकेट स्पर्धेतील सहभागी प्रत्येक संघाला मंडळाच्या वतीने सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.















