ज्युदो ची उपयुक्तता आणि प्रचार यासाठी असोसिएशनचे कार्य कौतुकास्पद – संजना आग्रे

सिंधुदुर्ग जिल्हा आझाद जुदो असोसिएशनच्या वाढीव बांधकामाचा शुभारंभ संपन्न !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : गाव पातळीवर कार्य करणारी आझाद जुदो असोसिएशन आता सिंधुदुर्ग जिल्ह्याचे असोसिएशन म्हणून ओळखले जाते. हे प्रगतीपथावरील कार्य कौतुकास्पद आहे इथे देशपातळीवरील खेळाडू घडावेत, अशा शुभेच्छा फोंडाघाट सरपंच संजना आग्रे यांनी कामाच्या शुभारंभाचे श्रीफळ वाढविताना दिल्या. यावेळी शिवसेनेचे उपनेते संजय आग्रे यांनीही असोसिएशनच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देताना, सर्वंकष सहकार्याचे आश्वासन दिले.

सिंधुदुर्ग जिल्हा आझाद ज्युदो असोसिएशन फोंडाघाट यांना पहिला मजल्यावरील हॉल बांधकामासाठी, जिल्हा स्पोर्ट्स विभागाकडून नुकताच निधी मंजूर झाला. मंजूर झाला त्याचा शुभारंभ शिवजयंतीच्या दिनी करण्यात आला. यावेळी संदेश सावंत, श्यामसुंदर सावंत, आप्पा सावंत,विजयसिंह पोफळे सर, दीपक इसवलकर, शिवाजी पवार, भाई गुरव, रुपेश रेवडेकर, सागर सुतार, अजिंक्य पोफळे, संभाजी पाचंगे, अभिनंदन डोरले आणि खेळाडू उपस्थित होते.

error: Content is protected !!