खारेपाटण हायस्कूल केंद्रावर १० वी बोर्ड परीक्षा सुरळीत सुरू

खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा कोकण विभागिय मंडळ रत्नागिरी च्या वतीने घेण्यात येणाऱ्या एस एस सी बोर्ड परीक्षा सन – २०२५ ला कणकवली तालुक्यातील शेठ न.म.विद्यालय खारेपाटण केंद्रावर आज दि. २१ फेब्रुवारी २०२५ रोजी सुरवात झाली. खारेपाटण हायस्कूल येथे १० वी बोर्ड परीक्षा केंद्रावर एकूण १० शाळांचे मिळून सुमारे ३०३ विद्यार्थी परीक्षा देत असून याकरिता एकूण १३ वर्ग खोल्यांचा वापर करण्यात आला आहे. तर परीक्षेला सकाळी ११.०० वाजता सुरळीत सुरवात करण्यात आली. यावेळी खारेपाटण केंद्राचे केंद्रसंचालक एच एन अत्तार उपकेंसंचालक राजेश वारंगे तसेच खारेपाटण हायस्कूलचे मुख्याद्यापक संजय सानप व पर्यवेक्षक संतोष राऊत उपस्थित होते.

error: Content is protected !!