आजगाव तिरोडा फाट्यावर चिरेखाणीत दररोज सुरू अंदर बाहर जुगार पट
सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी आणि वेंगुर्ले तालुक्याच्या सीमेवर आजगाव तिरोडा फाट्यावरील सुरू असलेल्या चिरेखानीत अवैध अंदरबाहर जुगार पट जोरात सुरू असून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. काही दिवसांपूर्वी आजगाव हद्दीतील बंद चिरेखाणीत सुरू असलेल्या अंदर बाहर जुगार पट बाबत आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज ने पोलखोल करताच सर्व तक्षिमदारांनी त्या जागेवरील जुगार पट बंद करण्याचा निर्णय घेतला. मात्र दुसरी जागा शोधताना सर्व ” प्रभू” च्या हवाली करून सुरू असलेल्या चिरेखानीतच जुगार सुरू केला आहे. दररोज सायंकाळी ४ वाजता सुरू होणारा अंदर बाहर जुगार रात्री ९ वाजेपर्यंत जोरदार सुरू असतो. जिल्ह्यातील नामचीन २७ तक्षिमदार या जुगार पटाचे भागीदार असल्याची बातमी असून या जुगार अड्डा चा बीमोड पोलिस यंत्रणा कधी करणार असा सवाल जनतेतून होत आहे.










