बाल वयात लाभलेले संस्कारक्षम ज्ञान मुलांना भविष्यात सक्षम बनवितात !

फोंडाघाट लिटिल फ्लावर इंग्लिश मीडियम स्कूल च्या मुला- मुलींची शिवजयंती दिनी गड-किल्ले,मंदिरे,लाईट हाऊस आणि मिठागरांना अभ्यास भेट

फोंडाघाट (प्रतिनिधी) : आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना ऐतिहासिक विषयाचे ज्ञान मिळावे, भौगोलिक, सांस्कृतिक व शैक्षणिक गोष्टी प्रत्यक्ष पाहण्यास मिळाव्यात, त्यांना आपले ऐतिहासिक गड, किल्ल्यांबद्दल आकर्षण निर्माण होऊन आपल्या संस्कृती आणि परंपरांचा वारसा,मुलांनी जपावा या हेतूने यशवंत गड, रेडी (वेंगुर्ला) येथे शिवजयंतीचे औचित्य साधून भेट देण्यात आली. तेथील दुर्ग रक्षक प्रतिष्ठान (शिवप्रेमी प्रतिष्ठान ) यशवंतगड – रेडी मंडळ,आयोजित पौराणिक विषयावरील जिल्हास्तरीय वेशभूषा स्पर्धेत आपल्या शाळेच्या वि‌द्यार्थ्यांनी विषयाला साजेशा अशा वेशभूषा करून उत्कृष्ट असे सादरीकरण केले. या वयातच मुलांच्या कलागुणांना वाव मिळून त्यांच्यातील आत्मविश्वास, धडाडीपणा, वक्तृत्व चातुर्य वृध्दिंगत व्हावे हाच यामागील हेतू उपस्थित रसिकांच्या दाद मधून साध्य झाला. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना सन्मानचिन्ह देऊन मंडळाच्या वतीने गौरविण्यात आले.

त्यानंतर रेडी येथील प्रसिद्ध स्वयंभू गणपती मंदिर, सातेरी मंदिर, वेतोबा मंदिर या देवतांचे आशिर्वाद घेतले.या सर्व मंदिरांच्या ऐतिहासिक कथा व माहिती मुलांपर्यंत पोहोचवली. परतीच्या प्रवासात विद्यार्थ्यांना शिरोडा येथील मिठागर दाखवून मीठ निर्मितीची प्रक्रिया दाखविण्यात आली. सगळ्यात शेवटी वेंगुर्ला बंदराला भेट देऊन विद्यार्थ्यांना लाईट हाऊसची माहिती देण्यात आली.

ही सहल यशस्वी पार पाडण्यासाठी या स्कूलच्या प्राचार्या करूणा चिंदरकर, सहाय्यक शिक्षिका विनया लिंग्रस, गौरी गावकर, निलाक्षी चव्हाण रिया भिसे, श्वेता शिंदे, प्राजक्ता लाड, जाधव मॅडम, सहाय्यक कर्मचारी उर्मिला कुशे, व्हॅन ड्रायव्हर इत्यादींनी अनमोल सहकार्य केले. या संपूर्ण उपक्रमाचे पालक वर्गातून कौतुक होत आहे.

error: Content is protected !!