दिगशी गावात शिवजन्मोत्सव सोहळा खूप मोठ्या उत्साहात साजरा

वैभववाडी (प्रतिनिधी) : शिवप्रेरित युवा संघटना दिगशी आयोजित भव्य शिवजयंती उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सकाळी 11:30 वाजता  माजी सभापती बाळासाहेब हरयाण, प्रसिध्द उद्योजक विजय तावडे तसेच दिगशी  गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक यांच्या  शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. यावेळी संपूर्ण परिसर ” छत्रपती शिवाजी महाराज की जय।”, “जय भवानी जय शिवाजी” , “तुमचं आमचं नात काय जय जिजाऊ जय शिवराय” अश्या घोषणांनी  दणाणून गेला.

यानंतर गांगेश्वर विद्यामंदिर दिगशी या शाळेतील मुलांनी सुंदर नृत्य सादर केले.तसेच गावातील सर्व ज्येष्ठ नागरिकांचा शाल ,श्रीफळ ,पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.दुपारी उपस्थित सर्व शिवभक्तांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.सायंकाळी  महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला त्यावेळी महिला  मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.महिलांसाठी  संगीत खुर्ची स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं.

तसेच खेळ पैठणीचा या कार्यक्रमात विजयश्री धुरी,यांनी प्रथम क्रमांक तर द्वितीय रुचिता सोलकर तर तिसरा क्रमांक आला सुहासिनी धुरी यांनी पटकावला.रात्री दिगशी येथील ढोल पथकाने  या कार्यक्रमाला अजूनच शोभा आणली.ढोल ताशांच्या गजरात संपूर्ण परिसर दणाणून गेला.रात्री उशिरा बुवा मोतीराम सोलकर,सुरेश मोरे यांच्या सुस्वर भजनाने शिवजन्मोत्सव सोहळ्याची सांगता झाली.

या कार्यक्रमासाठी माजी सभापती बाळा हरयाण, प्रसिद्ध उद्योजक विजय तावडे ,नासिर भाई काझी , सरपंच प्रियंका हरयाण, माजी पोलीस पाटील गणेश हरयाण,स्वप्नील धुरी,संतोष हरयाण, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष साजिद काझी , सोसायटीचे चेअरमन ब्रम्हा हरयाण,पोलीस पाटील श्रीकांत पाष्टे ,ग्रामपंचायत सदस्या रिहाना काझी,सायली धुरी, ओमकार हरयाण ,संतोष हरयाण, सखाराम मंचेकर ,राजू सावंत, मंगेश सावंत ,अतुल मोरे, जयराज हरयाण, गुलजार काझी, स्वरा काडगे ,सुप्रिया मंचेकर अशा अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!