आंगणेवाडी नाट्य मंडळाच्या हीरक महोत्सवा निमित्त स्पर्धेचे आयोजन
मसूरे (प्रतिनिधी) : आंगणेवाडी नाट्य मंडळ मुंबई – आंगणेवाडी यांच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित एकांकिका स्पर्धेमध्ये सांघिक प्रथम पारितोषिक भाईदर येथील एकदम कडक नाट्यसंस्थेच्या “पाटी” या एकांकिकेने पटकावले तर कलादर्शन पुणे यांच्या “बॉईल्ड शुद्ध शाकाहारी” या एकांकिकेने सांघिक द्वितीय पारितोषिक पटकाविले. स्पर्धेचे परीक्षण प्रसिद्ध वृत्त निवेदक ऋषी देसाई, व दिग्दर्शक महेश सावंत यांनी केले. बाल कलाकार- देव चोपडे, रंगभूषा – मानसी कोकीळ, वेशभूषा – कला दर्शन व नाट्य शृंगार पुणे, प्रकाश योजना – साई शिरसेकर, नेपथ्य – ऋतुजा बोटे, पार्श्वसंगीत – रोहन पटेल, अभिनेत्री – ऋतुजा बोटे, अभिनेता – औदुंबर बाबर, लेखन – भावेश आमडसकर, दिग्दर्शन -प्रणय गायकवाड, उपविजेता संघ ऑल मोस्ट डेड, क्रक्स इन द मिरर, गुड बाय कीस या एकाकीकांची निवड करण्यात आली. अभिनय साठी ऑल मोस्ट डेड -ऋतुराज कुलकर्णी, गुड बाय कीस- अनिल आव्हाड, क्रक्स इन द मिरर – कृतिका मोरे, बॉईल्ड शुद्ध शाकाहारी -अमेय राजमाने, पाटी -विजया गुंडप यांची निवड करण्यात आली. विजेत्या सर्वांना प्रशस्तीपत्रक, रोख रक्कम आणि स्मृतिचिन्ह मान्यवरांच्या हस्ते भेट देण्यात आले. कोकणची भूमी ही नाट्य कलावंतांची भूमी आहे. या मातीने नाटकावर आणि लोककलेवर केलेले प्रेम हे कलावंत आणि इथल्या समाज रचनेच्या प्रेक्षक या दोघांच्या अतुट नाट्य प्रेमाची गोष्ट आहे. शहरी कलावंतांनी ग्रामीण रंगमंचावर येताना नाट्य कलाकृतीची अविट गोडी तेवढ्याच ताकतीने मांडली पाहिजे. आजही पुण्या मुंबईपेक्षाही गाव खेड्यांनी यात्रा वार्षिकाच्या निमित्ताने जपलेली नाट्य संस्कृती ज्यावेळी आपण कलावंत म्हणून समजून घेऊ त्याचवेळी खऱ्या अर्थाने कलावंत म्हणून ग्रामीण मंचाची ताकद किती मोठी आहे हे समजून येईल असे प्रतिपादन पत्रकार ऋषी देसाई यांनी यावेळी केले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष छोटू आंगणे, सचिव काका आंगणे, बाळा आंगणे, बाबू आंगणे, दिनेश आंगणे, संकेत आंगणे, निशिकांत आंगणे, प्रसाद आंगणे, तनुराज आंगणे, नंदू आंगणे, समीर आंगणे, महेश आंगणे, जयेश आंगणे आदी उपस्थित होते. सूत्रसंचलन अक्षय सातार्डेकर तर आभार बाबू आंगणे यांनी मानले.











