सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : राज्य स्तरीय महसूूल क्रीडा स्पर्धेत सुचित्रा आडारकर या तीन किलोमीटर चालणे या स्पर्धेत तृतीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या आहेत. नांदेड येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेतआडारकर यांनी सहभाग घेतला होता. सिंधुदुर्ग कोकण विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत त्यांनी तीन किमी चालणे या स्पर्धेत प्रथम क्रमांक तर उंच उडीत तृतीय क्रमांक पटकावला आहे. त्यांच्या या यशाबद्दल तहसिलदार रमेश पवार व त्यांच्या चहात्यांकडून त्यांचे कौतूक करण्यात आले आहे.
चित्रा आडारकर राज्यस्तरीय महसूल स्पर्धेत तृतीय क्रमांकाच्या मानकरी











