कणकवली (प्रतिनिधी) : नगरपंचायत गटनेता संजय कामतेकर यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे कणकवली शहरातील शिवाजीनगर बांधकरवाडी परबवाडी आदी भागात गायब झालेले मोबाईल नेटवर्क पुन्हा शनिवार 21 जानेवारी रोजी रात्रीपासूनच सुरू झाले आहे. बांधकरवाडी , परबवाडी, शिवाजीनगर परिसरात मोबाईल नेटवर्क गायब झाले होते. याबाबत नगरपंचायत चे गटनेते संजय कामतेकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधत त्वरित मोबाईल नेटवर्क सुरू करण्याची आग्रही मागणी केली होती.मोबाईल नेटवर्कअभावी स्थानिक नागरिकांची गैरसोय होत होती.नेटवर्क सुरू न केल्यास प्रसंगी आंदोलनाचा इशाराही कामतेकर यांनी दिला होता. अखेर कामतेकर यांनी घेतलेल्या अथक प्रयत्नांनंतर शिवाजीनगर, परबवाडी, बांधकरवाडी आदी परिसरातील मोबाईल नेटवर्क पुन्हा सुरू झाले असून नागरिकांनी कामतेकर यांचे आभार मानले आहेत.