कुडाळ (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग साई कृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल यांच्या वतीने दिव्यांग बांधवांचा जिल्हास्तरिय मेळावा दिनांक 28 जानेवारी, 2023 रोजी दुपारी ठिक 3.00 वाजता आयोजित करण्यात आला आहे. कसाल बाजारपेठ येथील सिध्दीविनायक मंदिर येथे हा कार्यक्रम संपन्न होईल. यावेळी दिव्यांग बांधवांचा रोजगार मेळावा व मार्गदर्शन तसेच महिलांचा हळदी कुंकूचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सोबतच सायंकाळी ठिक 7.00 ते 10.00 या वेळेत अंध बांधवांचा सप्तरंग म्युझिकल गृप सांगली मीरज येथील कलाकारांचा संगितमय कला अविष्काराचा कार्यक्रम (ऑर्केस्ट्रा) आयोजीत केला आहे. तरी सर्व दिव्यांग बांधवांनी आणि जिल्हावासीयांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन साई कृपा अपंग संस्थेचे अध्यक्ष अनिल शामु शिंगाडे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 9623655142 / 9765979450 या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा.
