कणकवली तालुका व्यापारी संघाचा अनोखा उपक्रम
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुका व्यापारी संघाच्या वतीने जागतिक महिलादिनानिमित्त महिलांना रोजगार मार्गदर्शन शिबिर कणकवली कॉलेजच्या एचपीसीएल सभागृहात आयोजित करण्यात आले होते. संप्रमुख व्यवसाय मार्गदर्शक होते विलास देउलकर यांनी उपस्थित महिलांना केंद्र आणि राज्य शासनाच्या लघु तसेच सूक्ष्म उद्योगाबाबत विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. शासकीय योजनांचा लाभ घेत महिलांनी आर्थिक सबल होण्याचे आवाहन केले.यावेळी व्यासपीठावर कणकवली व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक बेलवलकर,उपाध्यक्ष राजन पारकर,सल्लागार सीताराम उर्फ दादा कुडतरकर, माजी नगराध्यक्षामेघा गांगण,ग्राहक पंचायतच्या उपाध्यक्ष गीतांजली कामत अन अन्य व्यापारी मान्यवर उपस्थित होते. दीपप्रज्वलन अन सत्कार नंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक बेलवलकर यांनी केले,अशाप्रकारे महिलांचे उत्थापनाचे कार्यक्रम दरवर्षी घेणेत येणार असलेची ग्वाही बेलवलकर यांनी दिली. मेघा गांगण यांनी महिलांनी अशा कार्यक्रमाचे महत्व विशद करून महिलांनी जास्तीतजास्त उपस्थिती गरजेचे असलेचे प्रतिपादन केले,प्रमुख मार्गदर्शक विलास देउलकर यांनी महिलांच्या करिता पीएमजी,सिएमजी, अमृत, अण्णासाहेब पाटील, शामराव पेजे वगैरे योजना कार्यरत असलेने सांगून प्रोजेक्टमध्ये 1 कोटी पर्यंत कर्ज, 35% पर्यंत सबसिडी,कोणकोणते लघुउद्योग करू शकता,कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत. भरावयाचे हप्ते,वयोगट,संपर्क वगैरेबाबत उत्कृष्ट मार्गदर्शन करून आत्मविश्वास अन कष्ट आवश्यक असून महिलांनी या योजनांचा फायदा घेणेचे आवाहन केले. सदर कार्यक्रमाला कणकवली व्यापारी सह सचीव राजदक्ष, संतोष काकडे, नंकुमार आळवे, गाणपत्ये व अन्य व्यापारी वर्ग उपस्थित होते. सीताराम उर्फ दादा कुडतरकर यांनीही आपले मनोगत व्यक्त करून संपुर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
