वैभववाडी (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉक्टर ए.पी.जे .अब्दुल कलाम सिंधुदुर्ग रत्न प्रज्ञाशोध परीक्षा २०२४-२५ यामध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता चौथी च्या परीक्षेमध्ये वैभववाडी तालुक्यातून विद्या मंदिर नाधवडे ब्राह्मणदेव नवलादेवीवाडी ची विद्यार्थिनी दूर्वा संदीप कोळेकर हिने २४६ गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे.या यशाबद्दल तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोपाळ कोकाटे , शाळा समिती चेअरमन बाप्पी साहेब मांजरेकर ,केंद्रप्रमुख नाधवडे बोरकर सर,माजी जि प सदस्य सुधीर नकाशे., माजी सभापती बंड्या मांजरेकर ,सूर्यकांत कांबळे, नाना बंड , शैलजा पांचाळ विनिता कांबळे तसेच,शाळेचे मुख्याध्यापक संजय पाताडे सर यांनी विद्यार्थिनीचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.यावेळी सहकारी शिक्षक सावंत सर ,कुडतरकर मॅडम व संदिप कोळेकर, उपस्थित होते.
सिंधुदुर्ग रत्न प्रज्ञाशोध परीक्षेत विद्या मंदिर नाधवडे ब्राह्मणदेव नवलादेवीवाडी ची विद्यार्थिनी दूर्वा कोळेकर प्रथम












