सावंतवाडी (प्रतिनिधी) : बँकेत आर्थिक हेराफेरी केल्याच्या गुन्ह्यात शहरातील एका बँकेतील कर्मचारी असलेल्या आरोपी वैभव सावंत याला न्यायालयाने एक दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपी वैभव हा स्वतः आज पोलिस ठाण्यात हजर झाला
शहरातील एका बँकेत आर्थिक अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला संबंधित कर्मचारी आज स्वतःहून सावंतवाडी पोलिस ठाण्यात हजर झाला. वैभव सावंत असे त्याचे नाव आहे. दरम्यान त्याला येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता एक दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली. वैभव याने कर्तव्य बजावत असताना आपल्या अधिकाराचा गैरवापर करुन मृत असलेल्या खातेदाराच्या नावे असलेले पैसे आपल्या पत्नी व आईच्या नावाने खाते काढुन त्यात वर्ग केले होते. ही रक्कम सव्वा सहा लाख इतकी होती. दरम्यान हा प्रकार लक्षात आल्यानंतर बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या विरोधात येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. दरम्यान आज तो स्वतः पोलिस ठाण्यात हजर झाला. यावेळी त्याला येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला १ दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली.









