‘विनसम क्रीडा मंडळ वागदे’ यांच्या वतीने भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

आज होणार फायनलचा ‘महासंग्राम’

पालकमंत्री नितेश राणे यांची उपस्थिती

कणकवली (स्वप्नील तांबे) : विनसम क्रीडा मंडळ वागदे आयोजित भव्य दिव्य अश्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन दिनांक १९ मार्च ते २३ मार्च या कालावधीत करण्यात आले. २३ मार्च रोजी पालकमंत्री तथा मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. पालकमंत्री नितेश राणे यांचा सत्कार विनसम क्रीडा
मंडळाचे अध्यक्ष अनिल चव्हाण यांनी केले. यावेळी सरपंच संदीप सावंत, भाजपा तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, संपर्कप्रमुख समीर प्रभुगावकर, विनसम क्रीडा मंडळाचे कोच शेखर गावडे, गणेश गावडे, सचिव बबलू परब, के. के. परब, सागर गावडे, लोकमतचे पत्रकार गिरीश परब तसेच विनसम क्रीडा मंडळ वागदेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज फायनलचा शेवटचा सामना खेळवला जाणार असून, रात्रौ १० वाजता मोरेश्वर पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ मोरे – वाडोस कुडाळ यांचा नावाजलेला दशावतारी नाटक सादर होणार आहे. तरी सर्व रसिकांनी उपस्थित राहून या दशावतारी नाटकाचा आनंद लुटावा असे आवाहन विनसम क्रीडा मंडळ वागदे यांच्या कडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!