वैभववाडी (प्रतिनिधी) : नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचा निकाल काही दिवसांपूर्वी जाहीर झाला. अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल वैभववाडी मधील आठ विद्यार्थी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेस प्रविष्ट झाले होते. त्यातील पहिल्या गुणवत्ता यादीत कार्तिकी केळकर, मृणाल सरकटे, गौरांग ढवण या तिन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या निवडीबद्दल वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे व मुख्याध्यापक बी.एस.नादकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व वर्गशिक्षिका ए.जी.केळकर यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी मुख्याध्यापक बी.एस.नादकर प्रशालेचे सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
अर्जुन रावराणे विद्यालयाचे नवोदय प्रवेश परीक्षेत उज्वल यश












