प्रादेशिक पर्यटन योजने मधून नाधवडे उमाळा परिसर सुशोभीकरण करण्याबाबत पालकमंत्र्यांकडे मागणी

माजी सभापती बंड्या मांजरेकर यांचे पालकमंत्री नितेश राणे यांना निवेदन

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील नाधवडे उमाळा महादेव मंदिर परिसरात वैभववाडी पंचक्रोशीतील भाविक व पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणी भेट देण्यासाठी येत असतात. नैसर्गिक दृष्ट्या अतिशय सुंदर असलेल्या या परिसराचे सुशोभीकरण व्हावे अशी सर्वच भाविकांची व नागरिकांची इच्छा आहे. ही बाब लक्षात घेऊन वैभववाडी पं.स.चे माजी सभापती बंड्या मांजरेकर यांनी ओरस येथे आयोजित जनता दरबारात पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन प्रादेशिक पर्यटन योजनेतून नाधवडे महादेव मंदिर व उमाळा या परिसराचे सुशोभीकरण करण्याबाबत निवेदनाद्वारे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.

error: Content is protected !!