साक्षी बागवेची नवोदय विद्यालयासाठी निवड!

मसूरे (प्रतिनिधी) : झुंजार पेडणेकर जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, मसूरे देऊळवाडा या शाळेतील इयत्ता पाचवी मधील विद्यार्थ्यांनी साक्षी गणेश बागवे हिची नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेतून निवड झाली आहे. या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सदानंद कबरे,उपाध्यक्ष दीपिका लाकम, माजी पंचायत समिती सदस्य महेश बागवे, केंद्रप्रमुख नारायण देशमुख, मुख्याध्यापक प्रशांत पारकर, पालक व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे. तिला प्रशांत पारकर, गुरुनाथ ताम्हणकर, तेजल ताम्हणकर, कविता सापळे व पालक गणेश बागवे यांचे मार्गदर्शन लाभले.

error: Content is protected !!