मसूरे (प्रतिनिधी) : बड़नगर, उज्जैन, मध्यप्रदेश येथे हौशी ड्रॉपबॉल फेडरेशन (इंडिया) आयोजित राष्ट्रीय ड्रॉपबॉल अजिंक्यपद स्पर्धेचे औचित्य साधून सिंधुदुर्ग सुपुत्र अशोक दाभोलकर-मेस्त्री (मुख्य स्पर्धा निरिक्षक) व शशिकांत गवंडे (पंच) ह्याना हौशी ड्रॉपबॉल फेडरेशनचे अध्यक्ष अनिल फिरोजिया ( एम.एल.ए. उज्जैन) यांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले.
स्पर्धेचे यजमापद भुषविणार्या मध्यप्रदेश राज्याचे विक्रमादित्य अवार्ड विजेते व फेडरेशन कार्यकारी अध्यक्ष भास्करराव भागवत ह्यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या ह्या (पुरुष व महिला) स्पर्धेत पुरुष गटात अतिशय संघर्षमय सामन्यात राजस्थान संघाने महाराष्ट्राची कडवी लढत 2-1 अशी मोडून काढत अंतिम विजेते पटकावले. तसेच मु़ंबई संघाला तिसरा व मध्यप्रदेश संघ चौथ्या स्थानावर राहीला. मॅन ऑफ मॅच म्हणून महाराष्ट्राच्या शुभम काटेची निवड करण्यात आली.
महिला गटात मध्यप्रदेश संघाने सरळ दोन सेटमध्ये दिल्लीचा पराभव करुन अंतिम विजेतेपद मिळविले तर तिसऱ्या क्रमांकावर उत्तराखंड व महाराष्ट्र संघ चौथ्या क्रमांकावर राहीला.
महिला गटात मॅन ऑफ द मॅच -छावी पारवानी, बेस्ट शूटर- पूजा, बेस्ट डिफेन्स- कोयना दिक्षित व बेस्ट नेटमनचे बक्षिस आर. हश्मी हिला मिळाले.
स्पर्धा यशस्वी व्हावी म्हणून फेडरेशन अध्यक्ष श्री अनिल फिरोजिया (एम.एल.ए.) ह्यांच्या मार्गदर्शनाखाली, कार्याकारी अध्यक्ष सर्वश्री भास्करराव भागवत, महादेव माने, राजेश पंजाबी, मनोज चौव्हाण, मनोज अमन, अमरसिंह चौव्हाण, प्रकाश व्यास, विजय सस्ते, भागचंत कुमावत, अरीफ हुसेन, अतुल जगताप, हेमलता, सुबोध श्रीवास्तव आदी मान्यवरानी अतोनात मेहनत घेतली.ह्या संपूर्ण स्पर्धेचे प्रशासकीय कामकाज तसेच सूत्रसंचालन फेडरेशन सचिव महादेव माने ह्यानी जबाबदारीने सांभाळले.












