फोंडाघाट येथे संतश्रेष्ठ नामदेव महाराज यांचे १७ वे वंशज ह. भ. प. निवृत्ती महाराज नामदास यांचा उदंड भाविकांच्या उपस्थितीत कीर्तन सोहळा !

वाढदिनी मारुती मेस्त्री यांचा स्तुत्य उपक्रम ! पंचक्रोशीत कौतुक

फोंडाघाट (प्रतिनिधी) : आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा | माझिया सकळा हरीच्या दासा || हे पांडुरंगा, ज्या कुळांमधून भगवन भक्त जन्माला आले आणि दास झाले माझ्या हरीचे ! अशा भक्तांचे रक्षण करण्यासाठी मी ही मागणी करतो. सतत आत्मपरीक्षण करत राहणे हा आपल्यातील अहंकार ओळखण्याचा एकमेव मार्ग आहे. अशा निरूपणातून ह. भ. प. निवृत्ती महाराज नामदास यांनी आपल्या कीर्तनासाठी जमलेल्या भक्तिभाव- रसिक भाविकांना मंत्रमुग्ध केले. फोंडाघाट येथे संतश्रेष्ठ नामदेव महाराज यांचे सतरावे वंशज ह. भ. प. निवृत्ती महाराज नामदास यांचा, आपल्या परिवारासह फोंडाघाट येथील तबलावादक व कलाकार मारुती मेस्त्री यांच्या वाढदिनी कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला होता.

वारकरी संप्रदाया तर्फे ह भ प नामदेव महाराज यांचे आणि परिवाराचे शाल- श्रीफळ देऊन, आणि स्वतः तयार केलेला मृदंग देत मारुती मेस्त्री व सहकाऱ्यांनी सत्कार केला. यावेळी ह भ प विनोद महाराज पाटील- मुंबई, ह भ प संतोष रेगडे महाराज- निळेली, ह भ प निवृत्ती मेस्त्री महाराज- ओरस, ह भ प विठ्ठल मेस्त्री महाराज- जांभवडे, ह भ प विजय मेस्त्री,- घोणसरी, ह भ प बापू महाराज, मुणगेकर, ह भ प मडवी महाराज, ह भ प राणे महाराज- हरकुल आणि जिल्ह्यातील नामवंत वारकरी, संप्रदायातील दिग्गज संतगण उपस्थित होते.

कीर्तनात पंचक्रोशीतील भाविकांनी एकच गर्दी केली होती. कीर्तनाची साथ अमोल पांचाळ – वैभववाडी व बंटी मेस्त्री – ओरस आणि स्थानिक वारकरी यांनी केली.या स्तुत्य उपक्रमाचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे.

error: Content is protected !!