पालकमंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नातून विजयदुर्ग एसटी डेपोसाठी नवीन बसेस

भाजपा तालुकाध्यक्ष बंड्या नारकर यांच्या हस्ते लोकार्पण

देवगड (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नातून विजयदुर्ग एसटी डिपोला मिळालेल्या नवीन एसटी बसेस चे उदघाटन भाजपा पडेल मंडल अध्यक्ष महेश उर्फ बंड्या नारकर यांच्या हस्ते करण्यात आले. भाजपा पडेल मंडळ अध्यक्ष बंड्या नारकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून जनसेवेत ह्या नवीन बसेस दाखल करण्यात आल्या. एसटी बस हे ग्रामीण भागातील वाहतुकीचे मोठे साधन आहे. या नवीन एसटी बसेस च्या माध्यमातून खेडोपाड्यातील सर्वसामान्य जनतेला आरामदायी प्रवास अनुभवता येईल असे प्रतिपादन बंड्या नारकर यांनी केले. यावेळी पडेल सरपंच भुषण पोकळे,भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष उत्तम बिर्जे,शक्तिकेंद्र प्रमुख अंकुश ठुकरूल,महिला तालुका अध्यक्ष संजना आळवे,समीर तानवडे,महेश बिडये,उपसरपंच रियाज काजी,सामाजिक कार्यकर्ते अवि गोखले,आनंद देवरुखकर ,दशरथ तळेकर,पुर्वा लोंबर ,शुभा कदम ,प्रतिक्षा मिठबावकर, ए टी आय सचिन डोंगरे,साई ओटवकर,राकेश तेली, ग्रामपंचायत अधिकारी वारे, दर्शन डोंगरे ,भाजपा कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!