अशा परीक्षेतून देवेन सारखे प्रज्ञावंत प्रशालेचे आणि गावाचे नाव उंचावतात-गटशिक्षणाधिकारी किशोर गवस

डॉ.ए. पी. जे. अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षेत फोंडा केंद्र शाळेचा देवेन रंजना विद्याधर पाटील तालुक्यात सर्वप्रथम व जिल्ह्यात तृतीय !

देवेन आणि यशवंत विद्यार्थी- विद्यार्थिनींचे पंचक्रोशी कौतुक

फोंडाघाट (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमार्फत, दरवर्षी इयत्ता चौथी व सातवीसाठी घेण्यात येणाऱ्या डॉ. एपीजे अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षेत,फोंडाघाट केंद्र शाळा नंबर एकचा विद्यार्थी देवेन रंजना विद्याधर पाटील यांने २७६ गुण मिळवून कणकवली तालुक्यात प्रथम तर, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान पटकावला. प्रशालेतून दहा पैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने प्रशाले ने शंभर टक्के निकालाचा बहुमान पटकावला आहे.

यामध्ये २०० पेक्षा जास्त गुण मिळवून स्वरूप शशिकांत सागावकर, वेदांत विजय आग्रे, ओम लकुल गोसावी,रुद्र धोंडू शिंदे तर भक्ती मधुकर पारकर, अस्मि हरिष शितोळे, मृणाल किशोर सामंत, तनया संतोष मडवी, स्वानंदी सुहास भिडे या विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या.

अशा परीक्षा मधून शाळेला प्रज्ञावंत विद्यार्थी- विद्यार्थिनी मिळतात आणि गावाचे, आपल्या शाळेचे नाव उंचावतात. त्याकरिता मुला-मुलींचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या गुरुजनांचे विशेष कौतुक ! असा गटशिक्षणाधिकारी किशोर गवस यांनी याप्रसंगी गौरव केला. या मुला- मुलींना मुख्याध्यापक सृष्टी गुरव, सहशिक्षिका वेदांती नारकर, रंजना पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. प्रशालेच्या यशासह देवेंद्र याचे शाळा व्यवस्थापन समिती, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, केंद्रप्रमुख आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून कौतुक आणि अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!