श्री देव पाचोबा देवस्थान येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन
फोंडाघाट (प्रतिनिधी) : कणकवली – फोंडाघाट मार्गावरील डामरे गावचे सीमेवर, देवराईत वसलेल्या पाच झाडांच्या सानिध्यात श्री देव पाचोबा देवस्थान ! येणाऱ्या – जाणाऱ्या वाहनचालक आणि कणकवली तालुक्यासह, फोंडाघाट पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान ! नवसाला पावतोss श्री देव पाचोबा धावतो sss ,आणि मागितलेली सर्व इच्छा, आरोग्य, अडचणी यांची पूर्तता करतो. अशी प्रत्येकाची निस्सिम भक्ती ! अशा लक्षणीय महती असलेल्या क्षेत्रात, आज कित्येक वर्षे रामनवमीला श्री देव पाचोबा देवस्थान तर्फे सौ. संजना आग्रे व संजय आग्रे आणि मित्र मंडळाकडून, विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यावर्षी सकाळी श्री सत्यनारायण पूजा, आरती- महाप्रसाद ,सायंकाळी होम मिनिस्टर स्पर्धा, स्थानिक भजने, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार आणि रात्री नऊ वाजता- बुवा रुपेंद्र परब ,अमित तांबोळकर ,सुंदर मेस्त्री यांच्यामध्ये संगीत भजन जुगलबंदी ! आणि त्याच दरम्यान मोफत लकी ड्रॉ असा कार्यक्रम होणार आहे. या दिवशी अभिनव ‘ रामनवमी उत्सव रील स्पर्धा ‘ आयोजित केली आहे. लक्षवेधी फुलांची सजावट, स्टॅच्यू ,देखावे यांची गुंफण निर्मिती अंतिम टप्प्यात आलेली आहे. या सर्व उपक्रमांमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन देवस्थान समितीतर्फे करण्यात आले आहे.














