वाशी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रभू पाटील यांची अतुल रावराणे यांनी घेतली सदिच्छा भेट

सिंधुदुर्गातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना एपीएमसी मध्ये जागा देण्याची केली मागणी

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : वाशी कृषी उत्पन्न बाजार समिती चे नूतन सभापती प्रभू पाटील यांची श्री भैरीभवानी प्रतिष्ठान चे अध्यक्ष अतुल रावराणे यांनी सदिच्छा भेट घेत सभापती निवडीबद्दल सत्कार केला. या भेटीवेळी अतुल रावराणे यांनी नूतन सभापती पाटील यांच्याकडे वाशी एपीएमसी मध्ये सिंधुदुर्गातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना आपला आंबा थेट ग्राहकांपर्यंत विक्री करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. सध्या आंबा हंगाम असून आंबा बागायतदार शेतकरी आपला आंबा वाशी एपीएमसी मध्ये दलालांकडे पाठवतात. परंतु दलाल आपले कमिशन ठेवून शेतकऱ्यांना मोबदला देतात.यात आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. अतुल रावराणे यांनी मागील काही वर्षांत सिंधुदुर्गात भैरीभवानी प्रतिष्ठान च्या माध्यमातून बळीराजा आत्मसन्मान योजना राबवून स्थानिक शेतकऱ्यांना मोफत काजू कलम खत वाटप केले होते. शेतकरी आर्थिक निर्भर व्हावा यासाठी अतुल रावराणे झटत आहेत. यासाठीच वाशी मार्केट मध्ये आंबा उत्पादक शेतकऱ्यांना जागा मिळाल्यास थेट ग्राहकांपर्यंत आपला आंबा विक्री करता येईल. दलालांचे कमिशन द्यावे लागणार नाही. त्यामुळे आंबा बागायतदार शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होईल. यासाठीच एपीएमसी चे नूतन सभापती पाटील यांची भेट घेतल्याचे अतुल रावराणे यांनी सांगितले.

error: Content is protected !!