सिंधुदुर्ग समाज साहित्य प्रतिष्ठानतर्फे नवीन कथाकरांचा शोध उपक्रम

उत्कृष्ट कथेला जयंत पवार स्मृती कथा पुरस्कार

कथा लेखकांनी कथा पाठविण्याचे आवाहन

गुणवत्ता पूर्ण दहा कथांचा ग्रंथ प्रसिद्ध करणार

कणकवली (प्रतिनिधी) : मराठी कथेला आशयाच्या दृष्टीने अधिक समृध्द करणारे साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कथाकार सिंधुदुर्ग सुपुत्र जयंत पवार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्ग या संस्थेच्यावतीने ‘नवीन कथाकरांचा शोध’ उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत जयंत पवार कथा पुरस्कारासाठी कथा मागविण्यात आल्या आहेत.
या उपक्रमातील विजेत्या कथाकाराला जयंत पवार स्मृती कथा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. पाच हजार रुपये, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल आणि ग्रंथ असे पुरस्काराचे स्वरुप आहे. मराठी साहित्यातील मान्यवर लेखकांच्या परीक्षणातून कथा विजेता निवडण्यात येणार आहे. या उपक्रमातील पहिल्या पाच कथा प्रसिद्धीयोग्य असल्यास त्या मराठील महत्वाच्या वाड:मयीन नियतकालकामधून प्रसिद्ध केल्या जातील. तसेच स्पर्धेतील दहा कथा गुणवत्तापूर्ण असल्यास त्या कथांचा स्वतंत्र कथासंग्रह प्रसिद्ध करण्यात येईल.अर्थात हा निर्णय परीक्षकांवर अवलंबून असेल.

या उपक्रमात भाग घेण्यासाठी सहभागी कथाकारांना पुढील नियम पाळणे बंधनकारक आहे.कथा स्पर्धेसाठी कोणतेही शुल्क नाही किंवा वयाची अट नाही,कथा स्वलिखीत स्वतंत्र असावी, ती अनुवादित नसावी.पूर्व प्रसिद्ध असली तरी चालेल, कथेसाठी शब्दसंख्येचे बंधन नाही.सहभागी होणाऱ्या लेखकांनी आपला पूर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर देणे अपेक्षित आहे, स्पर्धेतील विजेत्या कथाकाराला स्वतः उपस्थित राहून पारितोषिक स्वीकारणे बंधनकारक असेल, परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल, त्यात संस्था पदाधिकारी हस्तक्षेप करणार नाहीत.आपली कथा दिनांक ३१ मे पर्यंतvrsatam1979@gmail.com या मेलवर pdf स्वरूपात पाठवावी किंवा वैभव रामचंद्र साटम, प्रमुख कार्यवाह, समाज साहित्य प्रतिष्ठान, १०१ राजदीप को ऑप. हाउसिंग सोसायटीआशा हॉस्पिटल समोर, सेक्टर ४ ऐरोली,नवी मुंबई ४००७०८या पत्त्यावर पाठवाववी.काही शंका असल्यास ९८२१७१०७४५ या क्रमांकावर दुपारी २ नंतर संपर्क साधावा, असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!