कणकवली (प्रतिनिधी) : लोरे लघु पाटबंधारे योजना अंतर्गत उजवा कालवा बंदिस्त नलिका वितरण प्रणाली कालवा विषयाबाबत लोरे ग्रामस्थ निलेश अशोक राणे आणि रमेश विश्राम राणे हे बुधवार ९ एप्रिल पासून लाक्षणिक उपोषण छेडणार आहेत. ह्या कालव्याच्या बांधणीसाठी २ कोटी ४९ लाख ५३ हजार निधी खर्च होऊनही अद्याप लोरे, वाघेरी गावात पाणी येत नाही. कालवा बांधकाम करताना तोडलेल्या झाडांचा मोबदला जमीनमालकांना देण्यात यावा, सन २०२१ पासून २०२५ पर्यंत ५ वर्षे कालव्याचे पाणी न आल्यामुळे ५ वर्षे शेतकरी ऊस,भुईमुग, चवळी, तिळी ,सूर्यफूल मूग आदी शेती उत्पादन घेऊ शकला नाही. हे झालेले नुकसान भरून द्यावे, या कारणांसाठी ९ एप्रिल रोजी कालव्याची पाईप लाइन गेलेल्या मध्यभागवर फोंडा वैभववाडी महामार्गालगत तसेच मोना वहाळ लाक्षणिक उपोषण छेडणार असल्याचा इशारा निलेश राणे, रमेश राणे यांनी दिला आहे.
लोरे ल.पा योजनेच्या उजवा कालवा पिडीएन बाबत ९ एप्रिल रोजी लाक्षणिक उपोषण










