अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल येथे चावडी वाचन उपक्रमाला चांगला प्रतिसाद

वाचनाने आपले विचार प्रगल्भ होतात म्हणून विद्यार्थ्यांनी नियमित वाचन करावे- मंदार चोरगे

वैभववाडी (प्रतिनिधी) : निपुण महाराष्ट्र अंतर्गत चावडी वाचन व गणन उपक्रम घेण्यात आला यावेळी शाळेतील इयत्ता पाचवी च्या वर्गातील सर्व विद्यार्थी तसेच सहावी ते आठवी पर्यंतचे काही विद्यार्थी उत्स्फूर्तपणे या चावडी वाचन कार्यक्रमात सहभागी झाले होते. अपेक्षित अध्ययन स्तर प्राप्तीसाठी निपुण महाराष्ट्र अंतर्गत हा उपक्रम सर्वत्र घेण्यात येत आहे .निपुण भारत योजनेअंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान या उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याबाबत सरकारकडून निर्देश देण्यात आले आहेत मुलांमध्ये इयत्तेनुसार वाचन व लेखन क्षमता नसल्याचे शाळा भेट देऊन दिसून येत आहे त्यानुसार निपुण भारत अभियानाला पूरक कृती कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांचे चावडी वाचन व गणन उपक्रम सध्या सर्व प्राथमिक शाळांमध्ये आयोजित करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल येथे हा चावडी वाचन व गणन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध गद्य उतारे, संवाद लेखन, कविता यांचे आरोह अवरोहासह वाचन केले. तसेच अनेक विद्यार्थ्यांनी गणित वजाबाकी, बेरीज, गुणाकार, भागाकार या कृती फलकावर करून दाखवल्या.

यावेळी कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित शाळा व्यवस्थापन समिती, परिवहन समिती व अन्य शालेय समितीत्यांच्या पदाधिकाऱ्यांनी नवोदय विद्यालय प्रवेश परिक्षा, एन.एन.एम.एस. परिक्षा, सिंधु रत्न टॅलेंट सर्च, अशा अन्य स्पर्धा परिषदांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या चावडी वाचन उपक्रमाला, मुख्याध्यापक बी.एस.नादकर, प्रथम भाषा विषय शिक्षक एम.एस.चोरगे, गणित विषय शिक्षिका ए.जी.केळकर, एस.ए.सबनिस शालेय समित्यांचे पदाधिकारी पी.बी.पवार, पी.पी.सावंत, एन.व्ही.प्रभु, एस.टी.तुळसणकर, जे.एस.बोडेकर, आर.बी.चौगले तसेच पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

error: Content is protected !!