तर खारेपाटण प्रा.आ.केंद्रातील रुग्णांना फळे वाटप
खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच माजी केंद्रीय मंत्री तथा विद्यमान भाजप पक्षाचे खासदार नारायण राणे यांच्या दि.१० एप्रिल २०२५ रोजीच्या वाढदिवसा निमित्त आज बुधवार दी.९ एप्रिल २०२५ रोजी खारेपाटण शहरातील भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने माजी जि.प.बांधकाम व वित्त सभापती श्री रविंद्र उर्फ बाळा जठार यांच्या प्रमुख उपस्थितीत खारेपाटण येथील सर्व शालेय विद्यार्थ्याना खाऊ वाटप करण्यात आले.तर खारेपाटण प्रा.आ केंद्रातील रुग्णांस फळे वाटप करण्यात आली.यावेळी प्रा.आ. केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रिया वडाम उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाला खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर, उपसरपंच महेंद्र गुरव, भाजप शक्ती केंद्र प्रमुख सुधीर कुबल, महिला भाजप कार्यकर्त्या उज्ज्वला चिके,साधना धुमाळे, आरती गाठे,ग्रा.पं.सदस्य गुरुप्रसाद शिंदे, किरण कर्ले,जयदीप देसाई,सुधाकर ढेकणे, शितीजा धुमाळे,मानली,होनाळे,दक्षता सुतार, अमिषा गुरव,धनश्री ढेकणे,भाजप कार्यकर्ते शेखर कांबळी,देवानंद ईसवलकर,सौरभ धालवलकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
खारेपाटण जि.प.केंद्र शाळा नं.१ येथे खासदार नारायण राणे यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला.यावेळी विद्यार्थ्यांनी शुभेच्या दिल्या.तर खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.खारेपाटण केंद्र शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर सर यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे शब्द सुमनाने यथोचित स्वागत केले.यावेळी माजी जि.प. सदस्य रवींद्र उर्फ बाळा जठार यांनी नारायण राणे साहेबांच्या वाढ दिवसानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दरम्यान खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त खारेपाटण येथील सर्वच शाळामधील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.


