सिंधुदुर्ग प्रीमियर लीग  मध्ये एनसीसी नरगोल देवगड संघ अजिंक्य!

आम. नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस समारंभ

मसुरे (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा फ्रेंड्स सर्कल मुंबईच्या वतीने नेरुळ नवी मुंबई येथे झालेल्या जिल्हा मर्यादित मुंबई एसपीएल  या क्रिकेट स्पर्धेत एनसीसी  नरगोल देवगड संघाने बलाढ्य वरद इलेव्हन सिंधुदुर्ग संघाचा पराभव करत  विजेतेपद पटकावले.  स्वयंभू इलेव्हन ओवळीये आणि कोकण पॅकर्स देवगड या संघाना तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. क्रिकेट सामन्यामध्ये 32 संघ मालकानी बलाढ्य खेळाडू उतरवले होते. बक्षीस वितरण आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

विजेत्या एनसीसी नरगोल संघाला  आयोजन कमिटी तर्फे आकर्षक  चषक व आमदार नितेश राणे  यांच्या सौजन्याने रोख रुपये 30,000 चे बक्षीस देण्यात आले.  उपविजेत्या वरद इलेव्हन संघाला आयोजन कमिटी तर्फे आकर्षक चषक आणि माजी खासदार निलेश राणे  यांच्या सौजन्याने रोख रुपये 20,000 चे बक्षीस देण्यात आले. तृतीय क्रमांक स्वयंभू इलेव्हन ओवळीये आणि कोकण पॅकर्स देवगड या दोन्ही संघाला डॉ. अमित दुखंडे यांचा सौजन्याने आकर्षक चषक व सौ. वैशाली ताई राणे यांच्या कडून प्रत्येक संघाला रोख रुपये 5,000 बक्षीस देण्यात आले.  मान्यवर दात्यांनी सुद्धा अनेक पारितोषिके दिली.

स्पर्धेचे आयोजन चेतन वि.रासम , अनिल मातेफोड , वसंत परब , दीपक रासम , स्वप्नील तेली , महेश चव्हाण , अमित धुरी यांनी केले. स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग पालकमंत्री रवींद्र चव्हाण , आमदार नितेश राणे, सौ वैशाली राणे , अमित दुखंडे , विनायक अपराज , दीपक परब , तुकाराम रासम , राजन गावडे , प्रथमेश सावंत आणि इतर मान्यवर मंडळींनी सहकार्य केले.

पंच म्हणून मेघशाम होडावडेकर आणि संतोष राऊत यांनी तर सामनाधिकारी  सतीश मणचेकर आणि गुणलेखन तानाजी रासम आणि मंगेश राणे यांनी केले. समालोचन राजा सामंत, वैभव गावडे , सिद्धेस कास्ते, आबा कोचरेकर, मांजरेकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!