डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित पुस्तक प्रदान सोहळा उत्साहात संपन्न

वैभववाडी (प्रतिनिधी) : विद्या मंदिर लोरे मांजलकरवाडी (ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग) येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४व्या जयंतीनिमित्त भव्य असा पुस्तक प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी आणि सन्मानपूर्वक वातावरणात संपन्न झाला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष विलास नावळे साहेब (सरपंच, ग्रामपंचायत लोरे नं. 2) होते. प्रमुख अतिथी म्हणून रुचिता कदम मॅडम (शिक्षण विस्तार अधिकारी, प्रभाग खांबाळे), मा. संजय रासम सर (केंद्रप्रमुख, केंद्र लोरे-हेळेवाडी), दिलीप मांजलकर (अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती) आणि विजय मांजलकर (सेवानिवृत्त शिक्षक, रयत शिक्षण संस्था) यांची उपस्थिती लाभली.

याशिवाय गावातील अनेक मान्यवर कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले होते. ज्ञानेश्वर संकपाळ (असिस्टंट मॅनेजर, म्हाडा), माजी सरपंच महेंद्र रावराणे, देऊ मांजलकर गुरुराज डोंगरे प्रकाश गव्हाणकर भास्कर पांचाळ सत्यवान तर्फे दीपक तर्फे दीपक रावराणे शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, पालकवर्ग तसेच ग्रामस्थ यांनीही उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे दाते विजयजी मांजलकर सर यांचा शाळेस यांनी शाळेस २०,००० रुपयांची विविध विषयांवरील उपयुक्त पुस्तके आणि १०,००० रुपयांचे कपाट प्रदान करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस हातभार लावला. शाळेच्या वतीने त्यांचा मानाची शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना प्रमुख पाहुण्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर प्रकाश टाकत, शिकून स्वतःला घडवा आणि समाजासाठी योगदान द्या, असा प्रेरणादायी संदेश दिला. त्यांनी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना पुस्तकांचे महत्व पटवून देत, वाचनसंस्कृती रुजवण्यावर भर देण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन राजेंद्र पाटील सर यांनी केले. त्यांच्या ओघवत्या निवेदनाने संपूर्ण कार्यक्रमाला सुसंगतता आणि भारदस्तपणा मिळवून दिला. कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक बाळू भांड सर यांनी उपस्थित सर्व मान्यवर, पालक, ग्रामस्थ, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक आभार मानले. हा संपूर्ण कार्यक्रम विद्यार्थ्यांना ज्ञान, समता आणि प्रेरणा यांचा संगम घडवणारा ठरला. महामानवांच्या कार्याचा उज्वल ठसा मनामनावर उमटवणारा हा सोहळा अनेकांच्या स्मरणात कायमचा कोरला गेला.

error: Content is protected !!