उबाठा-सेना फोंडाघाट मध्ये अजूनही संपलेली नाही – माजी शहरप्रमुख सुरेश टक्के !
फोंडाघाट (प्रतिनिधी) : जीजी आणि फोंडाघाटवासी यांचे एक वेगळे नाते आहे. त्याच्या वाढदिवशी आठवडी बाजाराच्या असुनही पेठेमध्ये लाडू वाटप करण्यात आले. यावेळी पंचक्रोशीतील महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. लाडू वाटप कार्यक्रमांमध्ये उबाठा सेनेच्या तालुकाप्रमुख माधवी दळवी उपतालुकाप्रमुख संजना कोलते, विजय जामदार सुरेश टक्के सुधीर राणे, बाळा येळवकर, सतीश मेस्त्री भाई सावंत इत्यादी उपस्थित होते.फोंडाघाट सारख्या ग्रामीण भागातील उबाठा सेना कदापि संपुष्टात आली नाही, अथवा येणार नाही. केवळ मनाने कधीच नसलेले ,आषेपोटी अथवा भीतीपोटी इतर पक्षात प्रवेश करीत आहेत, अशी स्पष्टोक्ती माजी शहरप्रमुख सुरेश टक्के यांनी यावेळी व्यक्त केली.











