नांदगाव येथे 7 एप्रिल रोजी मोफत दिव्यांग आरोग्य तपासणी शिबीर व साहित्य वाटप

नांदगाव (प्रतिनिधी) : राजमुद्रा मेडिकल फाउंडेशन व दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल यांच्या वतीने जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने 7 एप्रिल रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र नांदगाव येथे सकाळी 9 ते दुपारी 1 पर्यंत मोफत दिव्यांग आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन व ज्यांना गरज आहे अशा लोकांना नंतर तज्ञ डॉक्टर मार्फत तपासणी करून कानाच्या मशीन, व्हीलचेअर, कुबड्या ई साहित्य वाटप करण्यात येणार आहे.
कणकवली, देवगड व वैभववाडी या तालुक्यातील जास्तीत जास्त दिव्यांग बांधवानी लाभ घ्यावा असे डॉ तपसे व अनिल शिंगाडे यांनी आवाहन केले आहे.अधिक माहीतीसाठी मोबाईल : 9765979450 शिंगाडे, 9604104777 डॉ तपसे यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!