खारेपाटण ग्रामपंचायतीचा प्रशासन आपल्या दारी” उपक्रम
खारेपाटण(प्रतिनिधी) : “ग्रामपंचायत प्रशासन आपल्या दारी ” या उपक्रमा अंतर्गत कणकवली तालुक्यातील खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच प्राची ईसवलकर यांनी येथील पंचशील नगर या प्रभाग क्र.१ मधील मागासर्गीय नागरी वस्तीला नुकतीच भेट दिली.व येथील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेत.विविध विकास कामांना बाबत चर्चा केली.
खारेपाटण पंचशील नगर बुद्ध विहार येथे घेण्यात आलेल्या या बैठकीला येथील बौद्ध समाजाचे कार्यकर्ते तथा पंचशील विकास मंडळ खारेपाटण या मंडळाचे अध्यक्ष संतोष पाटणकर,खारेपाटण ग्रामपंचायत प्रभाग क्रं.१ चे सदस्य किरण कर्ले,अमिषा गुरव,शितीजा धुमाळे,ग्रामविकास अधिकारी जी सी वेंगुर्लेकर,संघमित्रा महिला मंडळाच्या अध्यक्षा आकांशा संतोष पाटणकर, सचिव आरोही राहुल पाटणकर,पंचशील विकास मंडळ खारेपाटण या मंडळाचे उपाध्यक्ष जितेंद्र कदम, खजिनदार – संदीप पाटणकर,ज्येष्ठ कार्यकर्ते मधुकर पाटणकर,अशोक पाटणकर आदी मान्यवर पदाधिकारी व लोकप्रतिनिधी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी पंचशील नगर खारेपाटण नागरिकांच्या वतीने सरपंच प्राची ईसवलकर व सहकारी ग्रामपंचायत सदस्याचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. “ग्रामपंचायत आपल्या दारी” या उपक्रमा अंतर्गत विविध व्यक्तिगत व सामूहिक योजनांची माहिती ग्रामविकास अधिकारी श्री वेंगुर्लेकर यांनी ग्रामस्थांना दिली. तर पंचशील नगर येथील विविध अपूर्ण कामाची तसेच नागरिकांनी नव्याने मागणी केलेल्या कामाची पाहणी सरपंच प्राची ईसवलकर यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन केली.
यावेळी खालील विकास कामांची मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली. १)कर्लेवाडी कडे जाणारा रस्ता ते अशोक पाटणकर घर अपूर्ण पायवाट पूर्ण करणे.२)प्रकाश पाटणकर घर ते दिपाली पाटणकर घर नवीन पायवाट तयार करणे.३)खारेपाटण बाजारपेठ ते पंचशील नगर रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे.४)संतोष पाटणकर घर ते कर्लेवाडीकडे जाणारी पायवाट काँक्रीटीकरण करणे.५)मधुकर पाटणकर घर ते प्रभाकर पोमेडकर घराकडे जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे.६)खारेपाटण बुद्धविहार परिसरात सुसज्ज गार्डन उभारणी करणे.७) पंचशील नगर येथील विहिरीवर कप्पी बसविणे.८) नागरी वस्ती वाढल्याने खारेपाटण पंचशील नगर येथे नवीन १० विद्युत पोल टाकून स्ट्रीट लाईट ओढणे.९)श्री गणपत पाटणकर यांचे घराजवळील वहाळ संरक्षक भिंत बांधणे.१०) खारेपाटण रामेश्वर नगर येथे असलेल्या बौद्ध स्मशानभूमीची दुरुस्ती करून सरक्षक भिंतीसह विज पाणी पुरवठा करून सुशोभीकरण करणे.११) शांताराम पाटणकर घर ते संतोष तुरळकर घर गटार खोदाई करून नव्याने बांधणे.१२)पंचशील नगर येथील अंगणवाडी स्वतंत्र नळ पाईप लाईन टाकून पाण्याची टाकी संरक्षक कठोडा बांधून मिळणे.आदी विवध मागण्या पंचशील नगर खारेपाटण येथील नागरिकांनी यावेळी खारेपाटण ग्रामपंचायत प्रशासणाकडे मांडल्या.