कणकवली येथे फाटलेले ओठ व टाळू असलेल्या रुग्णांसाठी मोफत तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर

वैभववाडी (प्रतिनिधी) : सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग, उपजिल्हा रुग्णालय कणकवली आणि ऑपरेशन स्माईल यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगाव येथील केएलई रुग्णालयात फाटलेले ओठ व टाळू असलेल्या रुग्णांसाठी मोफत तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिराअंतर्गत शस्त्रक्रियेपूर्व तपासणी शिबिर मंगळवार दिनांक १० मार्च २०२६ रोजी उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आले आहे. जन्मतः फाटलेले ओठ व टाळू असलेल्या ६ महिन्यांवरील सर्व वयोगटातील रुग्णांची या शिबिरात तपासणी करण्यात येणार आहे.

तपासणीनंतर निवड झालेल्या लाभार्थ्यांना १३ ते २० मार्च २०२६ दरम्यान केएलई रुग्णालय, बेळगाव येथे मोफत शस्त्रक्रियेसाठी नेण्यात येणार आहे. रुग्णांसोबत एक ते दोन नातेवाईकांसाठी मोफत प्रवास, निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

या शिबिराबाबत अधिक माहिती व नोंदणीसाठी ९४०४७४०४९०, ९४२१२३५५८६, ९६७३३६५९८८, ९४०३६३६४५४ या क्रमांकांवर संपर्क साधावा. तसेच शिल्पा खोत (९३०९१०३३३०), हिराचंद तानावडे (९४२३३०३६११), राजेश पडवळ (७०५७५४४६४३) आणि मकरंद सावंत (९४२०३०६०४८) यांच्याशीही संपर्क साधता येईल.

error: Content is protected !!