खारेपाटण गट विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीत

कै.सूर्यकांत उर्फ कांता आप्पा शेट्ये यांच्या तैलचित्राचे अनावरण

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण गट विकास विविध कार्यकारी सेवा सोसायटी लिमिटेड खारेपाटण या शेतकरी सहकारी संस्थेच्या खारेपाटण कार्यालयात संस्थेचे माजी अध्यक्ष तथा सहकार शेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ते कै.सूर्यकांत शंकर शेट्ये उर्फ कांता आप्पा शेट्ये यांच्या तैल चित्राचे अनावरण संस्थेचे विद्यमान अध्यक्ष तथा सिंधुदुर्ग जि.प.चे माजी वित्त व बांधकाम सभापती रवींद्र उर्फ बाळा जठार यांच्या प्रमुख उपस्थित नुकतेच दि. १ मे २०२५ रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून करण्यात आले. या कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष सुरेंद्र कोरगावकर, संस्था संचालक विजय देसाई, भाऊ राणे, एकनाथ कोकाटे,सौ उज्ज्वला चीके, इस्माईल मुकादम, मोहन पगारे, श्रीधर गुरव, अशोक पाटील, तृप्ती माळवदे, संतोष सरफरे, रवींद्र शेट्ये, संस्थेचे सचिव अतुल कर्ले, खारेपाटण माजी सरपंच वीरेंद्र चिके, शिक्षक इरफान सारंग आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी संस्था कार्यालयात प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी १ मे महाराष्ट्र दिनी श्री सत्यनाराणाच्या पूजेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर व उपसरपंच महेंद्र गुरव यांनी भेट देऊन शुभेछा दिल्या. तर सायंकाळी स्थानिक भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

error: Content is protected !!