आचरा (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंदर भटवाडीच्या वतीने आज शुक्रवार 2 मे रोजी सायंकाळी 6.30 वाजता भगवती माऊली मंदिर चिंदर भटवाडी येथे श्रीमद् भगवद्गीता पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
स्वागत, प्रास्ताविक, दिपोत्सव, मराठी अनुवाद, मान्यवरांचे मनोगत, श्री कृष्ण अर्जुन प्रवेश, १२ वा अध्याय पठण (संस्कृत), पसायदान, तीर्थ प्रसाद असा कार्यक्रम होणार आहे तरी सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहावे असे आवाहन मुख्याध्यापक सौ. निशिगंधा वझे व शाळा व्यवस्थापन समिती जि. प. शाळा चिंदर भटवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे..













