परब मराठा समाज सिंधुदुर्गच्या वतीने कुडोपी येथील कु. आदित्य परब याचा सत्कार…!

गुरुकुल प्रज्ञा शोध परीक्षेत जिल्ह्यातून 3 रा तर राज्यात 8 वा क्रमांक केला होता प्राप्त

आचरा (प्रतिनिधी) : गुरुकुल प्रज्ञा शोध परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 3 रा क्रमांक तर राज्यात 8 वा क्रमांक प्राप्त केलेल्या मालवण तालुक्यातील कुडोपी येथील कु. आदित्य गणेश परब याचे परब मराठा समाज सिंधुदुर्गच्यावतीने भेटवस्तू देऊन अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या. कु. आदित्य हा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुडोपी येथे पहिली इयत्तेत शिकत असून यापुर्वी अनेक परीक्षात त्याने यश प्राप्त केले आहे. यावेळी परब मराठा समाजाचे जेष्ठ आणि समाजसेवक गुरूदास परब, बाळकृष्ण परब, सुशील परब, शुभम परब, आनंद परब, विनोद परब, सुहास परब, आर, एल, परब, विवेक परब, गायत्री परब, गणेश परब आदी कार्यकर्ते उपस्थित होते. गुरुदास परब यांनी आदित्यला शुभेच्छा दिल्या तर आदीत्य याने सर्वाचे आभार मानले.

error: Content is protected !!