नांदगाव येथून विवाहिता बेपत्ता

कणकवली (प्रतिनिधी) : नांदगाव तिठा येथे वास्तव्यास असलेली शांतीकुमारी मोतीलाल देवारी (२१, मूळ रा. राजस्थान) ही विवाहिता बेपत्ता झाली. याबाबत पती मोतीलाल गुलाराम देवासी (२१, रा. सध्या रा. नांदगाव तिठा, मूळ रा. राजस्थान) यांनी कणकवली पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवार १ मे रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास शांतीकुमारी या घरातून काही न सांगता बाहेर पडल्या. त्या रात्री घरी परत न आल्याने तिचा मोतीलाल यांनी सर्वत्र शोध घेतला. मात्र, त्या कुठेही सापडून आल्या नाहीत. त्यामुळे त्या बेपत्ता असल्याची खबर मोतीलाल यांनी दिली आहे. याबाबत तपास कणकवली पोलीस करीत आहेत.

error: Content is protected !!