संदेश सावंत यांच्या हस्ते नागवे ग्रा पं नूतन इमारतीचे भूमिपूजन
कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील नागवे ग्रामपंचायत च्या नूतन इमारत बांधकामाचे भूमिपूजन माजी जि प अध्यक्ष संदेश सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार नितेश राणे यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून नागवे ग्रा पं च्या नूतन इमारतीसाठी 12 लाखांचा निधी जिल्हा नियोजन मधून मंजुर केला आहे.याप्रसंगी नागवे सरपंच सिद्धीका जाधव, उपसरपंच महेंद्र कुडाळकर, ग्रामसेवक जाधव, सर्व ग्रा पं सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते.