कणकवली (प्रतिनिधी) : ओसरगाव येथील माता वैष्णोदेवी महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरीता स्पर्धा परीक्षा (upsc, mpsc) अ ते ड वर्ग सर्व पदांची संपूर्ण माहिती विविध दाखले देत खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगितले. तसेच कशाप्रकारे या परीक्षांना आपण सामोरे जावे यासाठी सूचना दिल्या. स्वतः च्या 9 वी नापास निकालाचा इतिहास सांगून आपण कशाप्रकारे या ठिकाणी पोहोचलो ते सांगितले. श्री. रेडकर पुढे असेही म्हणाले की, फक्त शिक्षण असून चालत नाही पुढे जाण्यासाठी धडपड करणे गरजेचे असते. हे चित्र बदण्याची गरज असल्याचे मत मांडले.
कोकणा मधून जास्तीत जास्त प्रशासकीय अधिकारी तयार व्हावे,कोकण पुढे जावा याकरिता आज 173 व्याख्यानांच्या माध्यमातून संपूर्ण कोकणामध्ये विनामूल्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यानांच्या माध्यमातून जनजागृती करत आहेत. तिमिरातूनी तेजाकडे या शैक्षणिक चळवळीच्या माध्यमातून एक महान सामाजिक कार्य करत आहेत.
यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य समीर तारी, व्यवस्थापकीय अधिकारी, महाविद्यालायचे संतोष सावंत व अन्य सर्व प्राध्यापक तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.