उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 11 मे रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येणार राजकोट शिवपुतळ्याचे घेणार दर्शन
राणेंच्या गोवर्धन गोशाळा उदघाटनला राहणार उपस्थित
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या 11 मे रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत. त्याचा दौरा पुढीलप्रमाणे :
रविवार दिनांक 11 मे 2025 रोजी सकाळी 11.45, वाजता चिपी विमानतळ, जिल्हा सिंधुदुर्ग येथे आगमन व हेलिकॉप्टरने मालवणकडे प्रयाण, दुपारी 12.15 वाजता, टोपीवाला बोर्डिंग ग्राउंड हेलिपॅड, मालवण येथे आगमन व मोटारीने किल्ले राजकोटकडे प्रयाण, दुपारी 12.30 वाजता, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे दर्शन व पूजन समारंभास उपस्थिती (स्थळ :- किल्ले राजकोट, ता. मालवण), दुपारी 1 वाजता, मोटारीने टोपीवाला बोर्डिंग ग्राउंड हेलिपॅड, मालवणकडे प्रयाण, दुपारी 1.15 वाजता, टोपीवाला बोर्डिंग ग्राउंड हेलिपॅड, मालवण येथे आगमन व हेलिकॉप्टरने गोशाळा हेलिपॅड, कणकवलीकडे प्रयाण, दुपारी 1.30 वाजता, गोशाळा हेलिपॅड, कणकवली येथे आगमन व मोटारीने करंजे-सामटवाडी, ता. कणकवलीकडे प्रयाण, दुपारी 1.40 वाजता, गोवर्धन गोशाळा कोकण उद्घाटन सोहळ्यास उपस्थिती, (स्थळ :- करंजे-सामटवाडी, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) दुपारी 2.30 वाजता, मोटारीने गोशाळा हेलिपॅड, कणकवलीकडे प्रयाण, दुपारी 2.45 वाजता, गोशाळा हेलिपॅड, कणकवली येथे आगमन व हेलिकॉप्टरने चिपी विमानतळाकडे प्रयाण, दुपारी 3.15 वाजता, चिपी विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण