कणकवलीत आजपासून श्रामणेर शिबिर

कणकवली (प्रतिनिधी) : भारतीय बौद्ध महासभेच्या सिंधुदुर्ग व कणकवली शाखेच्या संयुक्त विद्यमाने 11 ते 15 मे या कालावधीत 13 ते 17 वयोगटातील मुलांसाठी कणकवली शहरातील सिद्धार्थनगर येथील बुद्धविहारात येथे युवक श्रामणेर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा शुभारंभ रविवार 11 मे रोजी सायंकाळी 4 वा. बुद्धविहारात होणार आहे. या शिबिराचे चैत्यभूमी येथील भन्ते बी सुमेधाबोजी हे संघ नायक असून 75 सेखिय, चिवाराचे महत्त्व, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र, तथागत भगवान गौतम बुद्ध चरित्र, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्धधम्म का स्वीकारला, पूजा साहित्याचे महत्त्व, बौद्ध धम्म संदेश वाहक, बौद्धांचे सण, मंगलदिन, बौद्धांची पवित्र स्थळे, डाॅ. आंबेडकर यांचा युवा संदेश, 22 धम्म प्रतिज्ञा, बौद्धांची मातृसंस्था दि बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडिया या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिराचा समारोप जानवली येथील बुद्ध विहारात भीमराव यशवंत आंबेडकर यांच्या उपस्थित होणार आहे. या शिबिरात बौद्ध समाजातील मुलांना पाठवावे, असे आवाहन भारतीय बौद्ध महासभेच्या सिंधुदुर्ग जिल्हा शाखेचे अध्यक्ष आनंद कासार्डेकर, कणकवली तालुकाध्यक्ष तालुकाध्यक्ष भाई जाधव, सचिव सुभाष जाधव, महेंद्र कदम, सुषमा हरकुळकर यांनी केले आहे.

error: Content is protected !!