मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे आगमन
कणकवली (प्रतिनिधी) : खासदार नारायण राणे यांच्या गोवर्धन गोशाळेच्या उदघाटनसाठी मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे करंजे येथे गोवर्धन गोशाळे ठिकाणी आगमन झाले आहे. त्यांच्यासोबत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आमदार तथा माजी मंत्री रविंद्र चव्हाण, आमदार दीपक केसरकर, आमदार रवींद्र फाटक, जिल्हाधिकारी अनिल पाटील आदी उपस्थित आहेत. खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे आमदार निलेश राणे, चिरंजीव अभिराज राणे, चिरंजीव निमिष राणे यांच्यासह राणे कुटुंबीयांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते गोशाळेच्या फलकाचे अनावरण आणि फीत कापण्यात आली. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बांधकाम मंत्र्यांसह सर्व अतिथीनि खासदार नारायण राणेंसह गोवर्धन गोशाळेचा फेरफटका मारला. खासदार नारायण राणे यांनी त्यांना गोवर्धन गोशाळेचे सविस्तर माहिती दिली.