चिंदर कोंडवाडी येथे आज आमने सामने महिला डबलबारी भजनाचा सामना…!

बुवा प्राजक्ता परब(सावंत) विरुद्ध बुवा ऋतुजा सावंत (पाळेकर) यांच्यात रंगणार सामना

श्री गणेश मंदिर येथील वार्षिक सत्यनारायण महापूजेचे निमित्त

आचरा (प्रतिनिधी) : चिंदर कोंडवाडी येथील श्री गणेश मंदिर येथे आज 12 मे रोजी वार्षिक सत्यनारायण महापूजे निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 1 ते 4 वाजता सत्यनारायण महापूजा, सायंकाळी 4 वाजता आरती, सायंकाळी 6 वाजता स्थानिक भजने, सायं 7 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम, रात्रौ 8 वाजता महाप्रसाद आणि रात्रौ 9.30 वाजता कार्यक्रमाचे विशेष आकर्षण आमने सामने महिला डबलबारी भजनाचा जंगी सामना बुवा. सौ. प्राजक्ता परब (सावंत) हनुमान प्रासादिक महिला भजन मंडळ देवगड, इळये पाटथर, पखवाज- प्रथमेश कोकम, तबला- संदेश परब विरुद्ध बुवा सौ. ऋतुजा सावंत (पाळेकर) मालवीर भूतनाथ प्रासादिक महिला भजन मंडळ घोणसरी, कणकवली, पखवाज-सुपल परब यांच्यात रंगणार असून भजन रसिकांनी डबलबारी भजनाचा आनंद घ्यावा असे आवाहन कोंडवाडी स्थानिक ग्रामस्थ व मुंबई मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!