कणकवली (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणेंच्या नेतृत्वाखाली भारत पाकिस्तान मधील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैनिकांचे मनोबल वाढविण्यासाठी कणकवलीत तिरंगा रॅलीचे आयोजन उद्या12 मे रोजी करण्यात आले होते. मात्र भाजपा प्रदेश कार्यालयातून आलेल्या सूचनेनुसार संपूर्ण राज्यात आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा यात्रा रद्द करण्यात आल्याची माहिती माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली आहे.
कणकवली मधील उद्याची तिरंगा यात्रा रद्द – समीर नलावडे
