आचरा (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक / उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणे यांच्या वतीने घेण्यात फेब्रुवारी 2025 रोजी घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परिक्षेतचा निकाल जाहीर झाला असून मालवण तालुक्यातील जनता विद्या मंदिर त्रिंबक प्रशालेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. प्रशालेतून 22 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते, ते सर्वच्या सर्व उत्तीर्ण झाले असून, कुमारी कोमल संतोष अपराज हिने 461 गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. कुमारी शर्वरी प्रशांत परब हिने 460 गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकाविला आहे, तर कुमारी केतकी प्रसाद घाडीगावकर हिने 451 गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला आहे, तसेच कुमारी प्रांजल बाळकृष्ण त्रिंबककर हिने 450 गुण मिळून चतुर्थ क्रमांक पटकाविला आहे आणि कुमारी हर्षदा प्रसाद घाडीगावकर हिने 448 गुण मिळवून पाचवा क्रमांक पटकाविला आहे.
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे माध्यमिक शिक्षण समिती त्रिंबकचे अध्यक्ष सुरेंद्र सकपाळ, उपाध्यक्ष अशोक बागवे, कार्यवाह अरविंद घाडी, तसेच सर्व कार्यकारणी तसेच मुख्याध्यापक प्रवीण घाडीगांवकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

















