न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाटची उज्वल यशाची परंपरा कायम.एस.एस.सी. चा निकाल १०० टक्के, १०८ पैकी १०८ विद्यार्थी उत्तीर्ण

फोंडाघाट (प्रतिनिधी) : कोकण विभागीय शिक्षण मंडळ रत्नागिरी मार्फत फेब्रुवारी/मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एस. एस.सी परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल, फोंडाघाटच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन करत यशाची उज्वल परंपरा कायम ठेवली आहे. या परीक्षेस प्रशालेच्या प्रविष्ठ झालेल्या १०८ विद्यार्थ्यांपैकी १०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रशालेचा निकाल १०० टक्के लागला असून यामध्ये विशेष योग्यता श्रेणीत ५६ विद्यार्थी, प्रथम श्रेणीत ३३ विद्यार्थी, व्दितिय श्रेणी ०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. प्रशालेने यावर्षी सुध्दा उज्वल निकालाची परंपरा कायम राखली आहे. ९० टक्केच्या वर १५ विद्यार्थी आहेत. आमच्या प्रशालेचा निकाल पुढील प्रमाणे आहे.

प्रथम तीन विद्यार्थ्यांची नावे

१. परब राज अजय ४७४/५०० ९४.८०

२. नानचे आर्यन संदीप ४६९/५०० ९३.८०

३. कु. भोगले काव्या संजय ४६८/५०० ९३.६०

९० व ९० टक्के पेक्षा जास्त गुणप्राप्त विद्यार्थी गुणानुक्रमे पुढील प्रमाणे:

१ बालेघाटकर गोविंद राजाराम ९३.४०
२ रेवडेकर दुर्वा रंजित ९३.००
३ रासम पारस विरेंद्र ९२.८०
४ बिडये सार्थ सचिन ९२.२०
५ तेली सलोनी सतीश ९१.८०
६ सामंत केदार विलास ९१.६०
७ लाड हितेश लक्ष्मण ९०.८०
८ सांडीम सिध्देश सुनिल ९०.८०
९ मर्ये अंतरा राजेंद्र ९०.४०
१० सावंत मानसी विनायक ९०.२०
११ चव्हाण साधना संतोष ९०.००
१२ लाड दुर्वेश अजित ९०.००

error: Content is protected !!